लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवणे आता झाले आणखी सुलभ

अर्ज प्रक्रियेत नेमकं काय बदललं? योजनेची संपूर्ण माहिती थेट खालीलप्रमाणे.

अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

अर्ज प्रक्रिया झाली आणखी सोपी, जलद आणि पारदर्शक

01

ऑनलाइन अर्ज

आपले सरकार पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार.

02

कागदपत्रे कमी

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार.

03

माहिती ऑटो-फेच

आधार क्रमांकाच्या आधारे माहिती ऑटो-फेच केली जाणार.

04

e-KYC

लाभार्थी मुलगी, तिचे माता-पिता यांची e-KYC करण्यात येणार.

योजनेच्या लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात

मुलगी
DBT
बँक खाते

एकदाच अर्ज

मुलीच्या जन्मानंतर एकदाच अर्ज करावा लागणार.

DBT द्वारे थेट लाभ

लाभाची रक्कम DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होणार.

तपशील स्वतंत्रपणे देण्याची गरज नाही

अंगणवाडी व बँक तपशील स्वतंत्रपणे देण्याची गरज नाही.

वारंवार कागदपत्रांची गरज नाही

वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज असणार नाही.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकूण ₹1.01 लाख रुपयांची तरतूद

या योजनेच्या माध्यमातून मिळणारा पैसे खालील ५ टप्प्यांमध्ये मिळणार आहे:

01

जन्मानंतर

₹5,000
02

पहिलीत

₹6,000
03

सहावीत

₹7,000
04

अकरावीत

₹8,000
05

18 वर्षे पूर्ण झाल्यावर

₹75,000

5 टप्प्यात मिळणारा एकूण लाभ

१,०१,०००

मुलीच्या जन्मानंतर किती दिवसांपर्यंत अर्ज करता येईल?

१ एप्रिल २०२३ पासून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी.

त्यानंतरच्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर १ वर्षाच्या आत अर्ज करावा लागणार.

योजनेच्या नियम व अटी

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी असावे.
  • लाभार्थीकडे महाराष्ट्रातील बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र असतील.
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेली कुटुंबे अर्ज करू शकतात.
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
पालकांचे आधार कार्ड
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (₹1 लाखांपेक्षा कमी)
केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड
मुलीचा जन्म दाखला
कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
बँक पासबुक
स्व-घोषणा प्रमाणपत्र
अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान ओळखपत्र
मुलगी शिक्षण घेत असल्यास चालू वर्षाचे बोनाफाइड प्रमाणपत्र

योजनेबद्दलची अधिक माहिती

  • ‘आपले सरकार’ पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार.
  • आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो-फेच केली जाणार.
  • लाभार्थी मुलींसह मातांचे e-KYC करण्यात येणार.
  • मुलीच्या जन्मानंतर एकदाच अर्ज करावा लागणार.
  • योजनेची लाभाची रक्कम DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.
  • अंगणवाडी व बँक तपशील स्वतः देण्याची गरज राहणार नाही.
  • वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही.
म्हणजेच, लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया आता अधिक सोपी, वेगवान आणि विश्वासार्ह होणार आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आपले सरकार पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार.

लाभाची रक्कम DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होणार.

5 टप्प्यांत एकूण ₹1,01,000 लाभ मिळणार.

मुलीच्या जन्मानंतर एकदाच अर्ज करावा लागणार.

लाभार्थी मुलगी, तिचे माता-पिता यांची e-KYC करण्यात येणार.